
गगनाला भिडलेली महागाई तसेच पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मुंबईत मंगळवारी संतापाचा मोठा भडका उडाला. शिवसेनेने सर्वसामान्य नागरिकांसाठी आवाज उठवत दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी जोरदार जनआंदोलन केले. मोठय़ा प्रमाणावर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून भाजप सरकारचा तीव्र निषेध केला. ‘इंधन दरवाढ रद्द करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’, अशा जळजळीत शब्दांत सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
नागरिकांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत मंगळवारी रस्त्यावरची लढाई सुरू केली. दक्षिण मुंबईत ठिकठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात आली. दक्षिण मुंबई विभाग क्र. 11 च्या वतीने भायखळा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील रस्त्यावर शेकडो शिवसैनिकांनी एकत्र येत महागाई आणि इंधन दरवाढीच्या प्रश्नावरून केंद्र व राज्यातील भाजप सरकारचा तीव्र निषेध केला. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, उपनेत्या-विभाग संघटक किशोरी पेडणेकर, विभागप्रमुख आशीष चेंबूरकर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात उपनेते दिवाकर (बाबी) देव, आमदार अजय चौधरी, श्रद्धा जाधव, भायखळा विधानसभा समन्वयक बबन गावकर, वरळी विधानसभा संघटक निरंजन नलावडे, उपविभागप्रमुख राम सावंत, हरीष वरळीकर, गजानन चव्हाण, पराग चव्हाण, नगरसेवक रमाकांत रहाटे, किरण तावडे, हेमांगी वरळीकर, अबोली खाडये, शाखाप्रमुख काका चव्हाण, मिनार नाटळकर, सुहास भोसले, सलीम शेख, निंगाप्पा चलवादी, जीवबा केसरकर यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी सहभाग घेतला.
शिवसेना मुंबई विभाग क्र. 1 च्या वतीने महागाईविरोधात एल्गार
इंधन दरवाढ व वाढत्या महागाईच्या प्रश्नावरून शिवसेना मुंबई विभाग क्र. 1च्या वतीने केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. शिवसेना विभागप्रमुख उदेश पाटेकर आणि महिला विभाग संघटक शुभदा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या आंदोलनामध्ये विधानसभा प्रमुख अशोक म्हामुणकर, बालकृष्ण धमाले, मिलिंद साटम, अशोक सोनावणे, विनायक सामंत, पांडुरंग देसाई, सचिन शिर्पे, वंदना खाडे, अमिता सावंत, अश्विनी सावंत, रोशनी गायकवाड, नगरसेवक धर्मेंद्र काळे, नगरसेविका सारिका झोरे, अरुण पवार, रामकृष्ण कदम, महिला विधानसभा पदाधिकारी, युवती सेना कार्यकारिणी सदस्य धनश्री कोलगे, सर्व शाखाप्रमुख, शाखा संघटिका तसेच मोठय़ा प्रमाणावर शिवसैनिक सहभागी झाले होते.
महागाई कमी करा, जनतेला दिलासा द्या
महागाईचा निषेध करण्यासाठी शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 तर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, माजी आमदार अरविंद नेरकर, नगरसेविका संपदा मयेकर, विधानसभा प्रमुख विकास मयेकर, शिवाजी राणे, सुनील कदम, अरविंद बने, संपत ठाकूर, बाजीराव मालुसरे, राजेश आवळेगावकर, पल्लवी सपकाळ, सुरेखा उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते. या आंदोलनाचे आयोजन विभागप्रमुख संतोष शिंदे व विभाग संघटक युगंधरा साळेकर यांनी केले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख बाळा अहिरेकर, संतोष वीर, संतोष घरत, मंगेश सावंत, वैभव मयेकर, अजय शेळके, राजेश हजारे, प्रभाकर पाष्टे, विजय पवार, तसेच युवासेना पदाधिकारी विकास आडुळकर, पायल ठाकूर, अनिकेत हळदणकर, अजिंक्य धात्रक, शुभम शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.





























































