
शिवसेनेच्या बैठकीचा व्हीप सर्व खासदारांना देण्यात आला होता आणि सर्वांना तो मिळालाही होता. त्यानंतरही जे खासदार बैठकीस गैरहजर राहिले त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून तुम्ही बैठकीला का आला नाहीत याची विचारणा केली जाणार आहे. आम्ही त्यांना नोटीस देत आहोत. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. व्हीप बजावल्यावर बैठकीस गैरहजर राहणाऱया खासदारांवर कायद्यात ज्या तरतुदी आहेत त्यानुसार आणि पक्षाच्या शिस्तीनुसारच कारवाई होईल, असं शिवसेना मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी स्पष्ट केलं.

























































