आंतर क्लब बॅडमिंटन लीगमध्ये शिवाजी पार्क जिमखाना विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई शहर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने माटुंगा जिमखान्यावर खेळल्या गेलेल्या आंतर क्लब बॅडमिंटन लीगमध्ये पुरुषांच्या क्लब गटाच्या अंतिम फेरीत शिवाजी पार्क जिमखान्याने  वायएमसीय स्टुडण्ट ड संघाचा 3-2 असा पराभव करत बाजी मारली.

क्रिकेटमुळे जागतिक कीर्ती मिळवलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याच्या खेळाडूंनी बॅडमिंटनच्या क्लब स्पर्धेतही जोरदार खेळाचे दर्शन घडवले. वायएमसीएच्या तनिष्क शिंदेने अंतिम फेरीच्या पहिल्या सामन्यात सुशांत शिंदेचा 5-11, 11-2, 11-7, 11-9 असा पराभव करत आघाडी घेतली. मात्र पुढच्याच सामन्यात जिमखान्याच्या दिनेश गणूने गिरीश बोऱ्हाडेचे आव्हान 11-13, 11-3, 11-3, 11-3 असे परतवून लावले. मग अमर खामकरने मयूर विराचा 11-6, 11-5, 11-6 असा सरळ सेट्समध्ये पराभव करत जिमखान्याला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

चौथ्या सामन्यात तनिष्कने गणूचा 11-6, 6-11, 11-9, 11-8 असा पाडाव करत वायएमसीएला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर निर्णायक पाचव्या आणि शेवटच्या सेटमध्ये सुशांत मांजरेकरने वेगवान खेळ करत गिरीश बोऱ्हाडेचा 11-7, 11-1, 11-5 असा धुव्वा उडवत जिमखान्याच्या जेतेपदावर 3-2 असे शिक्कामोर्तब केले.