
सामना प्रतिनिधी, नगर
शहरासह जिल्ह्यामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. नगर शहरामध्ये प्रत्येक चौकाचौकांमध्ये मंडप उभारून शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर दुसरीकडे पोवाडे लावून शिवजयंती उत्सव आस प्रारंभ झाला. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड , जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला.
‘जय भवानी-जय शिवाजी’ अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. नगर शहरामध्ये सर्वत्र भगवे वातावरण तयार झाले आहे. आज दुपारी चार वाजता बस स्थानकापासून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामध्ये पारंपरिक वाद्यांचा समावेश असणार आहे. एकंदरीत शिवजयंतीचा उत्साह नगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.































































