मोदींच्या नावाने मत मागायला आले तर कानाखाली आवाज काढा, आमदाराचं वादग्रस्त वक्तव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

मोदींच्या नावाने कुणी मत मागायला आलं तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा, असं वादग्रस्त वक्तव्य जनता दल सेक्युलरच्या आमदाराने केलं आहे. शिवालिंगे गौडा असं या आमदाराचं नाव आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी आरासिकेरे येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, मोदी स्विस बँकेत ठेवलेला काळा पैसा परत आणू शकले नाहीत आणि त्यांनी 15 लाख देण्याचं वचनही निभावलं नाही. यानंतर जर कुणी तुमच्याकडे मोदीनामाचा जप करत मत मागायला आलं तर त्याच्या कानाखाली आवाज काढा, असं गौडा म्हणाले.

भाजपकडून या वक्तव्यावर टीका होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात गौडा हिंसेचा प्रचार करत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. गौडा यांनी आपल्या समर्थकांना मोदी यांच्यावर दगडफेक करण्याचेही आदेश दिल्याचे आरोप भाजपकडून करण्यात आले आहेत.