दिग्विजय सिंह देशद्रोही – शिवराज सिंग चौहान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivraj

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना देशद्रोही ठरवले आहे. दिग्विजय सिंग हे दहशतवाद्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करतात असा आरोप देखील केला आहे. भोपाळ येथे पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.

‘दिग्विजय सिंह हे असे व्यक्ती आहेत जे जर एखाद्या पोलिसाने दहशतवाद्याला मारले तर ते दहशतवाद्याच्या घरी जातील. या अशा व्यक्ती दहशतवाद्यांना आदरार्थी हाक मारतात. दिग्विजय सिंहांच्या या अशा वागण्यामुळे मला ते अनेकदा देशद्रोही वाटतात, असे शिवराज सिंग चौहान यांनी पत्रकारांना सांगितलं.

दिग्विजय सिंह यांनी २०१३ मध्ये मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याविषयी बोलताना लश्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफीज सईदचा आदरार्थी उल्लेख करत त्याला साहेब म्हटले होते.