मिंदे गटातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. दरम्यान विधानसभा क्षेत्रातील भंडारा महामार्गाहून शहरातील राजीव गांधी चौक येथे रस्त्यावर अनेक महिन्यांपासून पडलेल्या खड्यामुळे अनेक लहान मोठे अपघात घडले.यासंदर्भात जिल्हाधिकारी, नगर पालिका भंडारा,सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला अनेकदा शिवसेनातर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) निवेदने दिली होती. मात्र या खड्यांची दुरुस्ती न झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय रहिपाडे व नरेंद्र पहाडे यांच्या नेतृत्वात राजीव गांधी चौकात ‘रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. मिंदे गटाचे आमदार भोंडेकर यांच्या शहरांमध्ये जिकडे तिकडे खड्डे पाहायला मिळत असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.भंडारा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर त्यांची सुटका करण्यात आली.