नर्सिंग होमचे फायर ऑडिट केल्यानंतरच उपचाराला परवानगी द्या! शिवसेनेची पालिकेकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bmc-2

मुंबईतील काढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिका 62 नर्सिंग होम ताब्यात घेऊन तिथे पूर्णवेळ कोरोना रुग्णालय उभारणार आहेत. मात्र, या नर्सिंग होमचे फायर ऑडिट केल्यानंतरच त्यात रुग्णांवर उपचार करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने पालिकेकडे केली आहे.

भांडुपच्या ड्रिम्स मॉलला लागलेल्या आगीत मॉलच्या तिसऱया मजल्याकरील सनराईज रुग्णालयातील 9 रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीकर, मुंबई महापालिका ताब्यात घेत असलेल्या सर्व नर्सिंग होमचे फायर ऑडिट केले गेले पाहिजे. अग्निसुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही वास्तू योग्य आहे, असे प्रमाणपत्र अग्निशमन दलाकडून मिळाल्यानंतरच या नर्सिंग होमचे रूपांतर कोरोना रुग्णालयांत करायला परवानगी दिली जावी तसेच काही नर्सिंग होमच्या ऑडिटमध्ये त्रुटी आढळल्यास या त्रुटी दूर करण्यासाठी त्यांना वेळ देण्यात यावा. मात्र, कोणत्याही परिस्थितीत फायर ऑडिट झाल्याशिवाय त्या कोरोना रुग्णांवर उपचार सुरू करू नयेत, अशी मागणी शिवसेना नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्याकडे केली आहे.