अंबाजोगाईत शिवसेनेची मदत थेट गावात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडा या गावातील काही कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंची निकड असल्याची माहिती मिळताच शिवसेना मदतीचा हात देत पुढे आली माजी उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांनी तातडीने ही मदत त्या गावातील कुटूंबाना दिली.

संकट कोणतेही असो या संकट काळात धावून जाते ती शिवसेना मग दुष्काळ असो, शेतकरी आत्महत्या असो अतिवृष्टी असो की कोरोना कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना पुढे येते, अंबाजोगाई तालुक्यातील पिंपला धायगुडा येथील काही कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूंची निकड आहे, अन्न धान्य संपले ही माहिती मिळताच शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी यांनी तातडीने आवश्यक मदत त्या कुटूंबापर्यंत पोहोच केली