
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
‘तुम्हाला मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणायला मदत करेन, कधीही फोन करा’, असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात संभाजीनगर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गुलमंडीवर जोरदार निदर्शने करून त्यांच्या पुतळ्याला जोड्याने मारले.
मी माता-भगिनींची माफी मागतो !
शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडीच्या संपर्कप्रमुख आमदार डॉ. मनिषा कायंदे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महानगरप्रमख प्रदीप जैस्वाल, सहसंपर्क संघटक सुनिला आऊलवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुलमंडी येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मुलींच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. ‘राम कदमचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय’, ‘भाजपच्या या रावणाला मातीत गाढा’, ‘राम कदम मुर्दाबाद’, ‘महिलांबद्दल अनुद्गार काढणाऱ्या राम कदमचा निषेध असो’, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर राम कदम यांच्या पुतळ्यास महिलांनी जोड्याने मारले.
महिला आघाडीच्या जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनात जि. प. अध्यक्षा अॅड. देवयानी डोणगावकर, वैजयंती खैरे, उपजिल्हासंघटक प्रतिभा जगताप, अंजली मांडवकर, सुनिता देव, शहर संघटक प्राजक्ता राजपूत, विद्या अग्निहोत्री, आशा दातार, तालुका संघटक जयश्री घाटगे, रेखा सुर्यवंशी, मीरा देशपांडे, सविता निंगोळे, नलिनी बाहेती, वनिता ठाकूर, नलिनी महाजन, पद्मा तुपे, दुर्गा भाटी, रेखा शहा, सुनिता सोनवणे, शोभा बडे, कविता सुरळे, सिमंतीनी गावडे, राजश्री राणा, देवयानी सिमंत, रेणुका जोशी, नगरसेविका ज्योती पिंजरकर, शिल्पाराणी वाडकर, सुमित्रा हळनोर, राजश्री पोफळे, सुनंदा खरात, शारदा राऊत, संगिता पुणेकर, सुषमा यादगिरे, रूख्मीणी पवार, ज्योती उपाध्याय, माधुरी देशमुख, सविता सुरळकर, अकका गनुरकर, अनुसया शिंदे, मालती कोसळे, लता जैस्वाल, कांता घुले चंद्रकला मते, अलका काकडे, शिला वाहुळे, जयश्री लुंगारे, संध्या कोल्हे, सुचिता आंबेकर, रंजना आहेर, कांता फसाटे, अरूणा राऊत, शांता औटी यांच्यासह महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.































































