
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हिंगोलीत जाहीर सभा झाली. या सभेच उद्धव ठाकरे यांनी मिंधे आणि भाजपची सालटी काढली. तसेच भ्रष्ट मिंध्यांना चांगलेच फोडून काढले. गद्दार विकले जातात, निष्ठावान विकले जात नाही, असेही त्यांनी सुनावले. भ्रष्ट सरकारला हटवत गुजरातल पाठवू आणि आपला स्वाभिमनी महाराष्ट्र निर्माण करू, असे आश्वासनही त्यांनी जनतेला दिले.
सभा घ्यायला उशीर झाला नाही, तरीही तुम्ही इथे थांबले आहात, यालाच निष्ठा म्हणतात. तुम्हांला मी काहीही दिले नव्हते, तरीही तुम्ही थांबला आहात. मात्र, ज्यांना आपण सर्वकाही दिले होते, तो गद्दारी करत निघून गेला. आपले इथे अनेक इच्छुक होते. प्रत्येकाची इच्छा होती, की भस्मासुराला आम्हीच गाडणार. मात्र, आपल्याला एकच उमेदवार द्यावा लागतो. यावर सगळ्यांनी एकमत केले आणि नाव ठरवले. हवे असलेले मिळाले नाही, तर काहीजण नाराज होतात, बंडखोरी करतात, मात्र, असे काहीही न करता सर्वांनी एकमताने माव ठरवले आणि उमेदवाराच्या मागे निष्ठेने उभे आहेत, हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. आपण त्यांचे कौतुक करतो, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आपण आज इथे गुंडगिरीवर नांगर फिरवायाला आलो आहे. नवीन पीक येण्यासाठी जे तण असतात, ते काढण्यासाठी नांगरणी करावी लागते. तसेच आता आपण नांगरणी करायला आलो आहे. आता नवे बीज आहे. याआधी आपण उमेदवार दिली, तुम्ही निवडून दिला. आपण जिथेजिथे गेलो तिथे आपल्यासमोर गद्दारच उभे आहेत. त्यांनी आपला पक्ष चोरला, चिन्ह चोरले आणि स्वतःला शिवसेना म्हणवून घेत आहेत. त्यावेळी आपली चूक झाली. त्यावेळी नको त्यांना उमेदवारी दिली. माझ्यावर विश्वास घेत त्यांना निवडून दिले. त्यात माझी चूक होती, ती आपण मान्य करतो. आपण त्यांना उमेदवारी दिली, त्या नालायकांनी गद्दारी केली. आता त्यांना वाटते की, नाटके केली, पैसा ओतला तर जनता विकली जातील. मात्र, त्यांना माहिती नाही, गद्दार विकले जातात, निष्ठावान विकले जात नाही. निष्ठा कोणाही विकत घेऊ शकत नाही, असेही त्यांनी ठणकावले.
गेल्या वेळी लोकसभेत तुम्ही गद्दाराला पाडले होते. आताही तुम्हाला गद्दाराला पाडायचे आहे. त्याला पाडून एवढे रसातळाला न्या की, कोणीही यापुढे शिवसनेशी गद्दारी करण्याचे स्वप्नही पाहता कामा नये. शिवसेनाप्रमुखांनी विचारांनी बांधून ठेवलेला हा शिवप्रेमी मावळा आहे. आपले हे नाते घट्ट आहे. आपण वर्षा बंगला सोडून निघालो होतो, अचानक बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा हा गद्दार तिथेच होता. त्यानेच नाटक केले की, साहेब मी जाणार नाही, तुम्ही बंगला सोडू नका, असे भोकाट त्याने पसरले. दुसऱ्या दिवशी हा ग्लास घेऊन तिथे नाचायला गेला. माणसाने किती नाकट करावे. त्याचे पापं आपल्याला नंतर कळली. अनेकदा मला वाचवा, असे म्हणत तो आपल्याकडे यायचा. आपल्याला वाटायचे, हा शिवसैनिक आहे, त्याला आपण वाचवायचो पण हा एवढा नाटकी आणि नालायक निघेल, असे वाटले नव्हते. या अनुभवातून आपण बरेच शिकलो आहोत. त्याचे काय करायचे ते तुम्ही ठरवले आहेत. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
विषय फक्त एका गोष्टीचा आहे की एका गद्दाराचा हा प्रश्न नाही. महाराष्ट्राशी झालेल्या गद्दारीचा आहे. कोरोना काळातही आपल्याला करणे शक्य होते, ते तुमच्या सहकार्याने केले. या काळात जनतेची काळजी घेण्यात महाराष्ट्र पुढे होता, याचे समाधान आहे. मी घरी बसून होतो, असा आरोप ते करतात. मात्र, घरी बसून आपण जनतेला सांभाळले, जनतेची घरं सांभाळली. त्यांच्यासारखी घरं फोडली नाही, ते वणवण फिरून घरं फोडत आहेत. ते घरफोडे आहेत. आपण कधीही कोणाचे घर फोडले नाही, फोडणारही नाही, ते पाप आपण कधीही करणार नाही, असेही ते म्हणाले.
जनतेचे प्रश्न आहेत, ते सोडवण्यासाठी आपण तिथे होते. आपल्याला अडीच वर्षे मिळाली असती, तर या मागण्या आता राहल्याच नसत्या. ते काम करण्यासाठीच आपण तिथे होते. त्यांनी अडीच वर्षात का केले नाही. आपल्या काळात आपण अनेक प्रकल्पांना मंजुरी मिळाली. आपल्या काळात सोयबीन प्रकल्प आला असता, तर लगेच मंजूर केला. आपल्या काळात सोयाबीनला 10 हजार भाव होता, तो 3500 वर आला आहे. कापूस खरेदी सुरुही झालेली नाही. सर्व शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.
आता महाराष्ट्रात मुन्नाभाई सर्किट फिरत आहेत. ये करेगा, वे करेगा, असे जुमलेबाजी ते करत आहेत. मात्र, मी बाळासाहेबांचे विचार सोडले, असा कांगावा ते करत आहेत. आपण एकही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. आपण भाजपला सोडले आहे. भाजप म्हणजे बाळासाहेबांचे विचार नाही, त्यांची पालखी वाहणे म्हणजे वाळासाहेबांचे विचार नाही. आता काहीजणांना कंठ फुटला आहे. शिवसेनेची काँग्रेस होईल. आमची काँग्रेस कशी होईल. तुम्हाला गाडण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत आहोत.
आमचे हिंदुत्व द्वेष पसरवणारे नाही. भाजपचे हिंदुत्व घरं पेटवणारे हिंदुत्व आहे. तर आपले हिंदुत्व घरातील चूल पेटवण्याचे आहे. जनतेची घरं पेटवून त्यांना स्वतःची घरातील चूल पेटवण्याची गरज आहे. ते भाषणातून मायाजाल, मोहजाल पसरवत आहेत. त्यांना मदत करणे, हा बाळासाहेबांचा विचार असूच शकत नाही. महाराष्ट्रात येत त्यांनी एक हे तो सेफ है सांगण्याची गरज नाही. आम्ही एकच आहोत आणि सेफच आहोत. आम्ही एक होऊन भाजप आणि सर्व चमच्यांना साफ करणार आहोत. ‘हम एक है, हम आपको साफ कर देंगे’ असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
मोदी यांची धुळ्यात सभा झाली. या निवडणुकीत मोदी आणि भाजपला धूळ चारणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना फटके बसले आहेत. ते कार्यकर्त्यांना विचारत आहेत. कुठे फटके बसले आम्ही मलम लावतो. कार्यकर्ते म्हणतात, लागलेले फटके दाखवू शकत नाही, आमचे मलम आम्हीच लावतो. आमच्या हक्काचे गुजरातला नेणार असाल तर तुमच्यामध्ये मी ठामपणे उभा आहे. 1500 रुपयात ते बहिणींचे मते विकत घेत आहे. त्यांना लाज वाटत नाही. जाऊ तिथे खाऊ, हेच त्यांचे धारण आहे. मिंधे रस्त्यांच्या कामांची टेंडर काढत आहेत. ती कामे झालेलीच नाही. जनतेचा पैसा गेला कोठे, मिंधे आणि भाजपच्या कंत्राटदार मित्रांचे खिसे भरले जात आहेत.
एक है तो सेफ है, भाजपच्या म्हणण्याप्रमाणे एकच म्हणजे अदानी सेफ आहे. जनता असुरक्षित आहे. महिला सुरक्षित नाही. स्वावलंबी महाराष्ट्र हावा की गुलामगिरी करणारा महाराष्ट्र हवा, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणार महाराष्ट्र हवा की दिल्लीच्या पायाशी लोळण घेणारा महाराष्ट्र नाही. मिंध्यांनी पक्ष फोडला पण लाखोंच्या संख्येने जनता आपल्या पाठिशी आहे. महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे. कुटुंबप्रमुख म्हणून हा माझा वचननामा आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी महिला पोलीस असलेली पोलीस ठाणी उभारणार आहोत. मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देणार आहोत. बेरोजगाराची समस्या आपण सोडवणार आहोत. जीएसटीचा वरंवटा सकाळापासून रात्रीपर्यंत जनतेवर फिरतो. जीएसटीवर ते त्यांचे खिसे भरत आहेत. जनता मात्र महागाईत भरडली जात आहे. आपले सरकार असते तर आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले असते. आता उद्योग गुजरातला जात आहेत. मोदी की गॅरंटी जुमलेबाजी ठरली आहे. ये बोलता प़डता हे, ये जुमला होता, असे अमिश शहा म्हणाले होते. अशी जुमलेबाजीवर विश्वास ठेवत जनता फसली आहे.
आता सरकार बदलण्यासाठी आम्ही उभे ठाकलो आहोत. कर्नाटकातील सरकार 40 टक्के कमीशन होते. महाराष्ट्र 60 टक्के कमीशन घेतात. ते पैसे कोठे जातात. आता गद्दारांचे फक्त 10 दिवस राहिले आहेत. त्यानंतर आमचे सरकार येत आहे. आमचे सरकार आल्यावर गद्दार आणि जनतेचे पैसो खाणाऱ्या गद्दारांनी तुरुंगात पाठवणारच. त्यांच्यात हिंमत असती, तर ते स्वतःचा पक्ष काढून ते मोदानात उतरले असते. त्यांच्यात हिंमत नाही, म्हणून पक्ष चोरला, चिन्ह चोरला आणि स्वतःच्या बापाचे नाव घेण्याची लज वाटते, त्यामुळे माझ्या वडिलांचा फोटो लावत आहेत. महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही, म्हणून त्यांना माझ्या वडिलांचा फोटो लावावा लागतो.
आपले सरकार आल्यावर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून घेणार आहोत. हे केंद्राचे काम आहे. दिल्लीत उंटावर बसून महाराष्ट्रातील शेळ्या हाकू शकत नाही. असे करणाऱ्यांना महाराष्ट्र हाकलून देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही यांनी भ्रष्टाचार केला. लाज, लज्जा, शरम त्यांना काही नाही. याबाबत मोदीही धमकी दिल्यासारखी माफी ते मागतात. हा महाराष्ट्राच्या जिव्हारी लागलेला घाव आहे. आपले सरकार आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहोत. ते आमचे दैवत आहे. राज्य कसे करायचे हे त्यांनी दाखवून दिले आहेत. त्यामुळे आजपासून अभिमानाने जय शिवराय म्हणा. आमच्या प्रेरणागीतातील जय भवानी, जय शिवाजी हे शब्द त्यांनी वगळायला सांगितले होते. आम्ही म्हणालो नाही हटवणार, तो आमचा श्वास आहे. ते शब्द आम्ही कसे हटवणार. महाराजांच्या वाघनखे त्यांनी आणली ती कोठे आहेत माहिती नाही, वाघनखांना अर्थ नसतो, त्या नखांच्या मागे असलेला वाघ महत्त्वाचा असतो.
आपले सरकार आल्यावर अदानीला दिलेली मुंबई आपली करणार आहोत. मुंबईतील रहिवाशांना मुंबईतच त्यांच्या हक्काचे घर देणार, असे आश्वासनही त्यांनी दिले. मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्यांना गुजरातला पाठवून आपण आपला स्वाभिमानी महाराष्ट्र घडवूया, असे आवाहनही त्यांनी केला.






























































