
सोशल मीडियावर दरदिवशी वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. एका तरुणाला स्विमिंग पूलमध्ये स्टंट करणं चांगलच महागात पडलं आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एक तरुण स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. तो तरुण स्वमिंगपूलच्या वॉटर स्लाइडच्या तोंडावर उभा राहून मजा घेत होता. दरम्यान एक तरुण त्या स्लाइडवरुन खाली येतो. ज्यातून पहिला एकजण नीट जातो मात्र पुढच्या क्षणाला दुसरा व्यक्ती येतो त्याच्या पायाची धडक त्या तरुणाच्या डोक्याला बसते. ते पाहून त्याला किती जोरदार टक्कर लागली याचा अंदाज लावला जावू शकतो.
— 1000 WAYS TO DIE (@1000waystod1e) May 6, 2023
ट्विटरवर शेअर करण्यात आलेला हा 13 सेकंदाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहीलेय की, पाण्यामध्ये अशापद्धतीची मस्ती कोण करतं भावा? तर दुसऱ्या युजरने लिहीलेय की, मजबूत जखमी झाला असेल तर अन्य एका यूजरने लिहीलेय, वाटतंय याची मान गेली.
























































