उत्सव पाककलेचा… उत्सव खाद्यसंस्कृतीचा, श्रावण महोत्सवाची जय्यत तयारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

श्रावण महिना म्हटला की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे उभा राहतो तो श्रावण महोत्सव. पाककलेचा आणि खाद्यसंस्कृतीचा उत्सव असलेल्या श्रावण महोत्सवाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात. त्यानुसार ‘श्रावण महोत्सव 2019’ चे पडघम वाजले असून त्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 1 ऑगस्टपासून 10 केंद्रांवर या महोत्सवाच्या प्राथमिक फेरीला सुरुवात होणार असून यामध्ये महिलांबरोबरच पुरुषांनाही सहभागी होता येणार आहे. दैनिक ‘सामना’ या स्पर्धेचे माध्यम प्रायोजक आहे.

उत्तरा मोने यांच्या मिती क्रिएशन या संस्थेच्या वतीने ‘श्रावण महोत्सवां’तर्गत पाककला आणि खाद्यसंस्कृतीच्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. श्रावण महोत्सवाच्या प्राथमिक फेरीचा विषय विविध प्रकारचे पराठे किंवा गोड वा तिखट थेपले हा आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी स्पर्धकांनी पदार्थ घरून करून आणायचे असून सजावट स्पर्धेच्या ठिकाणी करायची आहे. प्रत्येक सेंटरवरून पाच स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे. प्राथमिक फेरीचे मुख्य परीक्षक तुषार प्रीती देशमुख आणि न्यूट्रिशनिस्ट नामिता नानल असणार आहेत. पदार्थांची चव, पौष्टिकता आणि प्रेझेंटेशन यावर स्पर्धेचा निर्णय अवलंबून असणार आहे. अंतिम फेरीचे मुख्य परीक्षक डॉ. विठ्ठल कामत असणार आहेत. दरम्यान, या महोत्सवाच्या महाअंतिम सोहळ्यात पूर्णब्रह्मच्या जयंती कठाळे प्रेक्षकांशी थेट संवाद साधणार आहेत.

येथे रंगणार कार्यक्रम

1 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता  ज्ञानराज सभागृह, ठाणे (पश्चिम), , 2 ऑगस्ट रोजी 3 वाजता रुसी मेहता हॉल, ताडदेव, मुंबई, , 4 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हॉल, कात्रप, बदलापूर (पूर्व), , 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता आदित्य मंगल कार्यालय डोबिवली (पूर्व), , 10 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता प्रज्ञा प्रबोधिनी हॉल, गोरेगाव (पूर्व), , 11 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता वायएमसीए हॉल, माणिकपूर मैदान, वसई रोड (पश्चिम), , 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता न्यू सिटी स्कूल, सेक्टर-19, खारघर, , 13 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता चेंबूर महिला समाज, डी. के. सांडू मार्ग चेंबूर (पूर्व), , 18 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता लोकमान्य सेवा संघ टिळक मंदिर, विलेपार्ले (पूर्व), , 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता वनिता समाज हॉल, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम) येथे होणार आहे.