
सुपरस्टार यशच्या आगामी ‘टॉक्सिक’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा झाली आहे. या चित्रपटाची घोषणा करताना निर्मात्यांनी एक जबरदस्त टीझर व्हिडीओ प्रदर्शित केला होता. या टीझरमध्ये कोणत्या अभिनेत्रीचा आवाज होता? अखेर ही अभिनेत्री कोण, ते उघड झाले आहे. श्रुती हासनचा हा आवाज आहे.
लंडन येथील संगीतकार जेरेमी स्टॅक यांनी संगीतबद्ध केलेले गाणेदेखील या चित्रपटात ऐकता येईल. हे इंग्रजी गाणे श्रुती हासनने लिहिले आणि गायले आहे. श्रुतीने तिच्या मधूर आवाजात गाण्यात जीव ओतला आहे. ‘टॉक्सिक – ए फेयरी टेल फॉर ग्रोनअप्स’ या चित्रपटाच्या शीर्षकाने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. गीतू मोहनदास दिग्दर्शित हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होईल.




























































