
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
कर्नाटकच्या तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख, लिंगायत समाजाचे गुरू महंत डॉ. शिवकुमार स्वामी यांचे वयाच्या 111 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. डॉ. शिवकुमार स्वामी यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच संपूर्ण राज्यात उद्या सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून शिवकुमार स्वामी यांना श्रद्धांजली वाहिली.
HH Dr. Sree Sree Sree Sivakumara Swamigalu remained at the forefront of ensuring better healthcare and education facilities for the marginalised.
He represents the best of our traditions of compassionate service, spirituality and protecting the rights of the underprivileged. pic.twitter.com/Tp6o5ULU2d
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2019
Deeply pained to learn about the demise of Nadedaduva Devaru, Sri Sri Sri Shivakumara Swamiji of Siddhaganga Mutt. Swamiji has transformed millions of lives with his immense knowledge and positivity. I was fortunate to have received his blessings. pic.twitter.com/HCu2VKciqn
— Amit Shah (@AmitShah) January 21, 2019
I am sorry to hear about the passing of Shivakumar Swami Ji, Pontiff of the Siddaganga Mutt. Swami Ji was respected & revered by millions of Indians, from all religions & communities. His passing leaves behind a deep spiritual void. My condolences to all his followers.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 21, 2019
कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, सदानंद गौडा यांनी शिवकुमार स्वामी यांची मठाला भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. तसेच यापूर्वी उपमुख्यमंत्री जी.परमेश्वर यांनीही मठाचा दौरा केला होता. परंतु सोमवारी दुपारी शिवकुमार स्वामी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, महंत डॉ. शिवकुमार स्वामी यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अनेक नेत्यांसह दिग्गजांची रीघ लागली आहे.
#Karnataka: Karnataka CM HD Kumaraswamy visits Siddaganga Mutt. BS Yeddyurappa, MB Patil, KJ George and Sadananda Gowda also present. pic.twitter.com/OqoSG9aiqM
— ANI (@ANI) January 21, 2019
मठात भाविकांची गर्दी
दरम्यान, शिवकुमार स्वामी यांचे तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच मठात भाविकांची गर्दी झाली. स्वामी यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, सध्या भाविकांना त्यांच्या दर्शनाची परवानगी देण्यात आलेले नाही. तसेच मठातील गर्दी पाहता परिसरात पोलीस पथकही तैनात करण्यात आले आहे.
पित्ताशय आणि यकृताची शस्त्रक्रिया
गेल्या महिन्यात स्वामी यांच्यावर चेन्नईतील एका रुग्णालयात पित्ताशय आणि यकृताची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना बेंगळुरूला नेण्यात आले. येथे उपचारानंतर त्यांना तुमकुरू येथील सिद्धगंगा मठातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
कोण आहे डॉ. शिवकुमार स्वामी?
डॉ. शिवकुमार स्वामी यांच्या मठाचे जाळे कर्नाटकातील सर्व 30 जिल्ह्यात पसरले आहे. मठातील स्वामींचे प्रभुत्व आणि दबदबा पाहता अनेक राजकीय नेत्यांनी त्यांची भेट घेतली होती. कर्नाटकात तब्बल 18 टक्के लोकसंख्या लिंगायत समाजाची आहे, याच समाजाचा मुख्य मठ सिद्धगंगा बेंगळुरूपासून 80 किलोमिटर दूर असणाऱ्या तुमकुरू येथे आहे. याच मठाचे प्रमुख डॉ. शिवकुमार स्वामी हे होते. त्यांनी नेहमीच भाजपचा पाठिंबा दर्शवला होता. दरम्यान, डॉ. शिवकुमार स्वामी यांचे वर्चस्व पाहता त्यांना भारतरत्न देण्याचीही मागणी करण्यात आली होती.



























































