सिद्धिविनायक व शिर्डी मंदिरातील कर्मचाऱयांना दिवाळी बोनस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shirdi-trust

प्रभादेवी येथील सिध्दिविनायक मंदिर आणि शिर्डी संस्थानातील कर्मचाऱयांना राज्य सरकारने दिवाळी भेट दिली आहे. या दोन्ही मंदिरांमधील कर्मचाऱयांना एक महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान म्हणून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यामुळे या कर्मचाऱयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिध्दिविनायक मंदिरातील 237 कायमस्वरुपी कर्मचाऱयांना दिवाळीनिमित्त एक पगार सानुग्रह अनुदान मिळणार आहे. त्यासाठी सुमारे 42 लाख 25 हजार रुपये खर्च होणार आहेत. तर शिर्डी संस्थानमधील सुमारे सहा हजार कर्मचाऱयांनाही एक महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान म्हणून दिले जाईल. या सानुग्रह अनुदानावर 11 कोटी 75 लाख रुपये खर्च होतील.

कोविडच्या परिस्थितीमुळे दोन्ही मंदिरांमधील कर्मचाऱयांचे लक्ष बोनसकडे लागले होते. पण कर्मचाऱयांची दिवाळी गोड करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.