नवरीची नाचत एन्ट्री आणि तो पहिला किस! पाहा सिड-कियाराच्या लग्नाचा व्हिडीओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा विवाह 7 फेब्रुवारी रोजी पार पडला. जैसलमेर इथल्या सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनी एकमेकांशी साताजन्मांची गाठ बांधली. या विवाहसोहळ्याचे फारसे तपशील मिळू शकले नव्हते. मात्र, आता त्यांच्या विवाहाचा एक सुंदर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

शेरशाह या चित्रपटातून झळकलेल्या कियारा आणि सिद्धार्थने काही वर्षं एकमेकांना डेट केलं होतं. त्यानंतर या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. सूर्यगढ पॅलेसमध्ये राजेशाही थाटात हा विवाह सोहळा रंगला. या विवाहाची गुप्तता पाळण्यात आली होती.

आता कियारा – सिद्धार्थच्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते दोघं जयमाला हा विधी पार पाडताना दिसत आहेत. पंजाबी वधू प्रमाणे तिच्या भावंडांसोबत कियारा लग्नमंडपात येताना दिसत आहे. त्यानंतर एकमेकांना हार घालून त्यांनी वऱ्हाड्यांसमोर एकमेकांना किस केलेलंही या व्हिडीओत दिसत आहे. कियाराने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

पाहा व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)