हम रहें या न रहें कल; केके यांच्यावर आज मुंबईत अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके यांचे मंगळवारी रात्री 10.45 च्या सुमारास कोलकाता येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मात्र केके यांच्या डोके आणि चेहऱयावर जखमा असल्याने कोलकाता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. केके यांचे पार्थिव आज रात्री मुंबईत विमानाने आणण्यात आले. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

53 वर्षांचे केके म्युझिक कॉन्सर्टसाठी दोन दिवसांच्या कोलकात्या दौऱयावर होते. त्यांचा काल विवेकानंद कॉलेजच्या नझरुल मंच ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम होता. कार्यक्रमादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटत होते. रात्री कार्यक्रम संपवून ते पंचतारांकित हॉटेलला परतले. त्यावेळी त्यांना चाहत्यांनी गराडा घातला. पोलीस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार चाहत्यांनी केपेंसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र केके यांनी नकार दिला. त्यानंतर ते हॉटेलच्या लॉबीतून बाहेर पडले आणि वरच्या बाजूला गेले. तिथे धडपडले आणि जमिनीवर पडले. त्यांच्यासोबत असलेल्या माणसांनी हॉटेल प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर रात्री 10 च्या सुमारास त्यांना सीएमआरआय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत.

पोस्टमॉर्टम झाल्यानंतर केके यांचे पार्थिव रवींद्र सदन येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केके यांचे अंत्यदर्शन घेऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. केपेंच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली. सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. केके पदार्पणातील प्यार के पल, यारों या अल्बममुळे युथ आयकॉन बनले. आँखें में तेरी (ओम शांती ओम), खुदा (बचना ये हसींनो), जरा सी (जन्नत), खुदा जाने (बचना ये हसींनो), तडप तडप (हम दिल दे चुके सनम) अशी त्यांची कित्येक गाणी गाजली.  दरम्यान, केके यांच्या मृत्यूबाबत संशय वर्तविला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर कोलकाता पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. या घटनेशी संबंधित दोन जणांची चौकशी केली. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासले.

सर्वच स्तरांतून श्रद्धांजली

गायक के. के. यांच्या निधनाने बॉलीवूडसह देशभरात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरवरून शोक व्यक्त केला. प्रसिद्ध गायक के. के. यांच्या आकस्मिक निधनामुळे दुŠखी झालो आहे. आम्ही त्यांना त्यांच्या गाण्यांच्या माध्यमातून कायम स्मरणात ठेवू. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती संवेदना, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी भावना व्यक्त केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही दुŠख व्यक्त केले. के. के. यांच्या कुटुंबीयांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

स्टेजवर घामाघूम; शो आयोजक रडारवर

गायक के. के. यांचा फिटनेस उत्तम होता. तरीही त्यांना अचानक कोणता त्रास झाला, असा प्रश्न उपस्थित करीत चाहत्यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. के. के. यांच्या कार्यक्रमाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात ते स्टेजवरच प्रचंड घामाघूम झाल्याचे दिसत आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणचा एसी बंद झाला होता. तसेच ऑडिटोरिअममध्ये प्रचंड गर्दी झाली होती. घामाघूम होऊनही कॉन्सर्ट न थांबवता ते परफॉर्म करीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर शो आयोजकांवर गैरव्यवस्थापनाचा आरोप झाला आहे.