
रस्ता परिसरात स्वयंघोषित भाई आणि त्याच्या साथीदारांनी हातात कोयते व हॉकीस्टिक घेऊन धिंगाणा घातल्याचा प्रकार लिमयेनगर परिसरात घडला. त्यांना रोखण्यासाठी आलेल्या एका तरूणावर टोळक्यातील एकाने वार करण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय परिसरात दहशत माजविण्यासाठी ९ वाहनांची तोडफोड केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी केदार प्रकाश पाठक (वय ३७) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार मन्या कट्टमनी, करण्या व इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास लिमयेनगर भागात हातात लोखंडी कोयते, हॉकीस्टीक व दगड घेऊन रस्त्यावर तुफान राडा घालण्यास सुरवात केली. रस्त्याने जाणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात कोयत्याचा धाक दाखवत धमकावित होते. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता.
त्यावेळी फिर्यादी केदार यांनी आरोपींना अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी ‘आम्ही या एरियाचे भाई आहोत, आमच्यामध्ये कुणी आल्यास त्याचा मुडदा पाडू’ असे म्हणत एकाने केदारच्या डोक्यात कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर टोळक्याने दहशतीसाठी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या मोटार व रिक्षा अशा ९ वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.




























































