
उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील राजकीय हालचालींना वेग आला असून समाजवादी पार्टीने सत्ताधारी भाजप आणि मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला तगडा धक्का दिला आहे. बसपाच्या 6 निलंबीत आणि भाजपच्या एका आमदाराने सपामध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या उपस्थितीमध्ये हे आमदार ‘सायकल’वर बसले.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाविरोधात जनतेमध्ये आक्रोश आहे. जनता दु:खी असून येत्या निवडणुकीमध्ये भाजपचा सुपडा साफ होईल, असे अखिलेश यादव म्हणाले. तसेच अनेक लोकं सपामध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. येणाऱ्या काळात कोण-कोण सपामध्ये येईल हे आणखी स्पष्ट होईल, असेही अखिलेश म्हणाले.
Lucknow: Six suspended BSP MLAs — Hargovind Bhargav, Mujtaba Siddiqui, Hakim Lal Bind, Aslam Raini, Sushma Patel, and Aslam Chaudhary and BJP MLA from Sitapur Sadar Rakesh Rathore today joined Samajwadi Party in presence of party president Akhilesh Yadav. pic.twitter.com/CTcM52n0BW
— ANI UP (@ANINewsUP) October 30, 2021
भारजपने आपल्या घोषणापत्रातील आश्वासने पूर्ण केली नाहीत. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल असे भाजपने म्हटले होते. मात्र आज शेतकरी याबाबत प्रश्न विचारत आहेत. तसेच महागाईही वाढली आहे, असेही अखिलेश यादव म्हणाले. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी झांशी आणि मथुरेमध्ये मेट्रो बनवली जाईल असे म्हटले होते, मात्र मेट्रो सुरू झालेली नाही, असेही ते म्हणाले.
या आमदारांनी केला सपामध्ये प्रवेश
1. असलम राईनी (बसपा)
2. असलम अली चौधरी (बसपा)
3. मुजतबा सिद्दीकी (बसपा)
4. हाकिम लाल बिंद (बसपा)
5. हरगोविंद भार्गव (बसपा)
6. सुषमा पटेल (बसपा)
7. राकेश राठोड (भाजप)


























































