मालवण पालिकेच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवण नगरपालिका इमारतीच्या प्रवेशद्वारावरील स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना सकाळी घडली आहे. सुदैवाने यावेळी कोणीही प्रवेशद्वारावर नसल्याने अप्रिय घटना टळली. दरम्यान, स्लॅबच्या आतील लोखंडी शिगा गंजून गेल्या असल्याने लोखंडी खांबांचा आधार स्लॅबला देण्यात आला आहे.

मालवण पालिकेने गतवर्षी शतकमहोत्सव साजरा केला. त्याचा विचार करता पालिकेची इमारत १०० वर्ष जीर्ण झाली आहे. इमारतीच्या काही भागाचे दुरुस्ती काम प्रस्तावित आहे. अश्या स्थितीत इमारतीच्या प्रवेशद्वारावरील स्लॅब कोसळल्याने पालिकेत खळबळ उडाली आहे. तात्काळ लोखंडी खांबांचा आधार उर्वरित स्लॅबला देण्यात आला आहे.

नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पालिका अभियंत्यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर स्लॅब जास्त कमकुवत झाला असल्यास केवळ दुरुस्ती न करता नव्याने इमारत प्रवेशद्वार आराखडा तयार करावा. अशा सूचना नगराध्यक्ष यांनी दिल्या आहेत. तर नव्या अथवा दुरुस्ती कामाला जास्त वेळ लागत असल्यास इमारतीत प्रवेशासाठी पर्यायी मार्गाचा विचार सुरू असल्याचेही नगराध्यक्षांनी सांगितले.