
स्त्रिया, पुरुष, लहान मुले, वृद्ध या सर्वांनाच खूप सुंदर दिसण्याची इच्छा असते. कदाचित यामुळेच लोक त्वचेची चमक कायम ठेवण्यासाठी सौंदर्य उपचारांवर हजारो रुपये खर्च करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अत्यंत प्रभावी स्लॅप थेरपीबद्दल सांगणार आहोत. कोरिया आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये सुंदर त्वचा मिळविण्यासाठी लोक स्लॅप थेरपीचा अवलंब करतात. ही थेरपी चमकदार त्वचा मिळविण्यासाठी वापरली जात आहे. ही थेरपी स्त्री पुरुष सर्वजण वापरू शकतात. स्लॅप थेरपी अंतर्गत तुम्हाला गालावर चापट मारावी लागेल. शंभर वर्षांपासून प्रचलित असलेली ही पद्धत अधिक फायदेशीर असल्याचे दिसते. तसेच स्लॅप थेरपी केल्याने चेहरा सुंदर दिसतो असे म्हणतात.
स्लॅप थेरपीमध्ये चेहऱ्यावर हलक्या हाताने चापट मारली जाते. यामुळे त्वचा मऊ होते. तसेच त्वचेची रोमछिद्रे उघडतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. स्लॅप थेरपीमुळे चेहऱ्यावरील फाईन लाईन्सच्या समस्येमध्ये खूप आराम मिळतो. यामुळे चेहऱ्याच्या मांसपेशी सक्रिय राहतात आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो. स्लॅप थेरपीमुळे चेहरा आधीपेक्षा जास्त चमकदार होतो. चेहऱ्यावर हलक्या हाताने चापट मारल्याने पिंपल्ससह त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो.
या स्लॅप थेरपीअंतर्गत चेहऱ्यावर हलक्या हाताने 50 चापट्या मारल्या जातात. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते, त्वचा चमकदार आणि मऊ बनते.

























































