नसरुद्दीन शहा भावना मांडताहेत हे स्वातंत्र्याचे लक्षण, स्मृती इराणींचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर दिले आहे. नसरुद्दीन शहा भावना मांडताहेत हे स्वातंत्र्याचे लक्षण असल्याचा टोला स्मृती इराणी यांनी लगावला आहे.

माझी मुलं हिंदुस्थानमध्ये राहातात त्यामुळे भीती वाटते – नसरुद्दीन शहा

काही दिवसांपूर्वी नसरुद्दीन यांनी हिंदुस्थानात समाजमनात विष पेरले गेले आहे. माणसाच्या हत्येपेक्षा गाईच्या हत्येला महत्त्व देण्यात आले असून मला माझ्या मुलांच्या सुरक्षेची चिंता वाटू लागली आहे, असे वक्तव्य केले होते. यावरून मोठा वाद सुरू झाला. नसरुद्दीन यांच्या वक्तव्याला काहींनी पाठिंबा दिला तर काहींनी त्याला तीव्र विरोध केला होता.

मुस्लिमांना देशद्रोही ठरवल्याशिवाय एकही दिवस जात नाही – नसरुद्दीन शहा