वाढदिवस विशेष – टीम इंडियाचा ‘मराठमोळा’ चेहरा, बॅटिंगच नाही तर सौंदर्यावरही लाखो फिदा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची आघाडीची खेळाडू आणि ‘हुकुमी एक्का’ बनून मैदान गाजवणाऱ्या मराठमोळ्या स्मृती मंधानाचा आज वाढदिवस आहे. स्मृतीने आज 27 व्या वर्षामध्ये पदार्पण केले आहे. 18 जुलै 1996 ला मुंबईत जन्मलेली स्मृती मूळची सांगलीची रहिवासी आहे. तिच्या वडिलांचे नाव श्रीनिवास आणि आईचे नाव स्मिती आहे. तिला एक भाऊही असून त्याचे नाव श्रवण आहे.

महिला क्रिकेटमधील ‘रनमशीन’ अशी उपाधी मिळालेल्या स्मृतीला क्रिकेटची आवड तिच्या भावाने लावली. भाऊ क्रिकेट खेळतो म्हणून आपणही खेळावे असे तिला वाटायचे. परंतु तिच्या मापाचे कपडे मिळत नव्हते तेव्हा तिच्या आईने भावाच्या कपड्यांपासून तिला पोशाष बनवून दिलेला. तिचा भाऊ अंडर-15 मध्ये खेळायचा. भावाच्या पावलावर पाऊल टाकून स्मृतीनेही क्रिकेट खेळणे सुरू केले आमि अवघ्या 11 व्या वर्षी तिची अंडर-19 साठी निवड झाली.

2013 मध्ये स्मृती मंधानाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली. गुजरातविरुद्ध 150 चेंडूत 224 धावा फटकावत अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष तिने वेधून घेतले. हाच फॉर्म तिने आगामी काळातही दाखवल्याने तिला बांगलादेशविद्ध टी-20 मालिकेमध्ये संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात तिने 36 चेंडूत 39 धावा फटकावल्या. त्यानंतर 2014 च्या आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकपसाठी तिची हिंदुस्थानच्या संघात निवड झाली. तेव्हापासून तिने मागे वळून पाहिले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Mandhana (@smriti_mandhana)

2018 च्या वर्ल्डकपमध्ये स्मृतीने आपल्या बॅटचा तडाखा विरोधी संघांना दिला. या स्पर्धेत तिने दोन शतक ठोकत सर्वांनाच चकीत केले. स्मृतीच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर हिंदुस्थानने फायनलमध्ये स्थान मिळवले होते.

स्मृतीने आतापर्यंत 74 एक दिवसीय लढतीत हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहेत. यात तिने 42.5 च्या सरासरीने 2892 धावा केल्या आहेत. 5 शतक आणि 23 अर्धशतकांची नोंद तिच्या नावापुढे आहे. तसेच 87 टी-20 लढतीत तियने 25.7 च्या सरासरीने 2033 धावा केल्या आहेत. या दरम्यान तिने 14 अर्धशतक ठोकले आहेत. तसेच चार कसोटीत तिने 46.4 च्या सरासरीने 325 धावा केल्या असून यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Smriti Mandhana (@smriti_mandhana)