
दिंडोशी मतदारसंघातील नागरिकांना विरंगुळय़ासाठी एक उत्तम आणि हक्काचे ठिकाण मिळावे यादृष्टीने शिवसेनेच्या पुढाकाराने प्रभाग क्र. 40 मधील ‘माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे उद्यानाच्या’ सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
उद्यानाच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ विभागप्रमुख- आमदार सुनील प्रभू आणि नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधानसभा समन्वयक आशा केणी, उपविभाग समन्वयक विनिता विचारे, संदीप जाधव, संपत मोरे, पद्मा राऊळ, सुनंदा सपकाळ, शाखा समन्वयक मीनल साळवी, ऋतुजा गुजर, दीपक बिऱहाडे, सुबोध महाडिक, शोभा नागदेवते, नयना मगर, महाड तालुका संपर्कप्रमुख मंगेश हुमणे तसेच शिवसेना शाखा क्र. 40 आणि 41 मधील पदाधिकारी उपस्थित होते.
























































