शिवसेनेच्यावतीने माझगावमध्ये सामाजिक उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने माझगाव विभागात गरजूंना ब्लॅंकेट वाटप, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱयांना भेटवस्तू वाटप तसेच बच्चे पंपनीसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला शिवसैनिकांसह विभागातील आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शिवसेना उपनेते, कामगार नेते आणि माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांच्या हस्ते माझगाव ताडवाडी म्युनिसिपल दवाखाना आणि आरोग्य पेंद्र, लव्हलेन शेठ मोतीशाह लेन माझगाव म्युनिसिपल दवाखाना तसेच रे रोड आरोग्य पेंद्रातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्यसेविकांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. याशिवाय विभागातील गरजू व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक 209 व 210 च्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शाखा क्र. 212च्या वतीने शाखाप्रमुख विनोद शिर्पे आणि शाखा संघटक सोनल सायगावकर यांच्यावतीने विभागात भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला बच्चे पंपनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 375हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता.

 या कार्यक्रमाला उपविभाग संघटक आणि माजी नगरसेविका सोनम जामसूतकर, उपविभाग संघटक कीर्ती शिंदे, शीतल थोरात, विधानसभा समन्वयक बबन गावकर, उपविभागप्रमुख विजय कामतेकर, विधानसभा संघटक चंदना साळुंखे, शाखाप्रमुख सुहास भोसले, निंगप्पा चलवादी, शशिकांत माटे, शाखा समन्वयक रमेश चेंदवणकर, प्रदीप बागवे, ऋता कोळी, शाखा संघटक संध्या तळेकर, समन्वयक अरुण जोंधळे, महिला समन्वयक विद्या राबडिया, मुंबई समन्वयक अमित जाधव, मुंबई टॅक्सी चालक मालक संघाचे कार्याध्यक्ष बाळा सावंत, समाजसेवक सुनील देठे, ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रभारी कार्यकारिणी सदस्य देविदास माडिये, युवासेना उप समन्वयक योगेश झावरे, शिवसैनिक प्रमोद लाड, ऐश्वर्य साटम आदी उपस्थित होते.