सोसल तेच सोशल – आक्षेपार्ह पोस्टला ग्रुप अॅडमिनही राहणार जबाबदार

सोशल मीडियावर अनेकदा आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जातात. तसेच या पोस्ट बिनधास्तपणे व्हायरल केल्या जातात. याविरोधात पोलिसांनी आता कडक पावले उचलली आहेत. अशा पोस्ट टाकणारे, रिप्लाय देणारे यांच्यावर गुन्हा दाखल होईल. आक्षेपार्ह पोस्टला ग्रुप अॅडमिनही जबाबदार असेल.

लोकसभा निवडणूक व आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सोशल मीडियावर लक्ष आहे. प्रत्येकाने पोस्ट व्हायरल करण्यापूर्वी खात्री करावी, अन्यथा पोस्ट टाकणारा आणि त्याला प्रतिसाद देणाऱयाविरुद्धही गुन्हा दाखल होऊ शकतो, असा इशारा सोलापूर पोलिसांनी दिला आहे.

आपल्या व्हॉट्सअ‍@प ग्रुपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱयांची माहिती पोलिसांना देणे, सेल्फ अ‍@डमिनचा पर्याय निवडणे, ग्रुपमधील आक्षेपार्ह पोस्ट डिलीट कराव्यात, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

n व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, यूटय़ूबसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर पोलिसांचा वॉच आहे.

n गुन्हा दाखल झाल्यावर आरोपींना आर्थिक दंड लाखांवर असून तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.

n व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिनविरुद्ध पण भादंवि कलम 34  नुसार गुन्हा दाखल होतो. तत्पूर्वी अॅडमिनचा ग्रुप सुरू करण्यामागील हेतू पडताळला जातो.

n दोन धर्मांत किंवा जातीत तेढ निर्माण होईल किंवा महापुरुषांबद्दल बदनामीकारक पोस्ट व्हायरल करणाऱयांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधली कला 66 ( सी ) व भादंवि कलम 505 ( 2) यासह इतर कलमांगर्तत गुन्हा दाखल होतो.