सोलापुरात परीक्षा केंद्रावरच भरारी पथकासह आता बैठे पथक तैनात

दहावी व बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागातर्फे वालचंद कॉलेजमध्ये मुख्याध्यापकांची बैठक झाली. या बैठकीला विस्तार अधिकारी गुरव, वालचंदचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी  उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी बाबर यांनी मुख्याध्यापकांना गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. गतवर्षी कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच परीक्षा झाल्या होत्या. पण आता कोरोना संसर्ग नाही. त्यामुळे भयमुक्त वातावरणात मूळ परीक्षा केंद्रावरच आता परीक्षा होणार आहेत. कॉपीमुक्त अभियानासाठी भरारी पथकाबरोबर बैठय़ा पथकामार्फत परीक्षा केंद्रावरील वातावरणाचे व्हिडीओ शूटिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक केंद्रप्रमुखांनी कॉपीमुक्त अभियान राबविण्यावर भर देणे गरजेचे असल्याचे बाबर म्हणाले.