जिव्हाळा दिव्यांग निवासी शाळेतील 42 विद्यार्थ्यांसह 8 शिक्षक बाधित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गाकातील जिव्हाळा दिव्यांग निकासी शाळेतील 42 विद्यार्थ्यांसह 8 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकावेळी एकाच ठिकाणी 50 जणांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, जि. प. चे वैद्यकीय अधिकाऱयांचे पथक अंत्रोळी गावात दाखल झाले असून, तपासणी सुरू केली आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हाभरातील विद्यार्थी निवासासाठी या शाळेत आले होते. 12 फेब्रुवारीला या शाळेतील काही शिक्षकांना त्रास होऊ लागल्याने शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी 6 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. यानंतर पुन्हा तपासणी केली असता, ही संख्या वाढत जाऊन 42 विद्यार्थी आणि 8 शिक्षक कोरोनाबाधित झाल्याची माहिती संस्थेचे प्रमुख अण्णाराव राजमाने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.

या 50 जणांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे. एका 65 वर्षीय वृद्धाला त्रास होत असल्याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, इतर सर्वांवर शाळा परिसरातच उपचार सुरू आहेत. इतर विद्यार्थी व शिक्षकांना घरी पाठविण्यात आले आहे.

विद्यार्थी बाधित आढळलेल्या शाळा (कंसात विद्यार्थी)

जावली तालुक्यातील 1 शाळा (1 विद्यार्थी), कराड तालुका 2 (6), खटाव 4 (32), कोरेगाव 3 (3), वाई 1 (3), खंडाळा तालुका 4 शाळा (4 विद्यार्थी) शाळांचा समावेश आहे. पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयातील सर्वाधिक 26 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले आहेत. या शाळांची तपासणी आरोग्य विभागातर्फे सुरू करण्यात आली असून, कोरोनाबाधित विद्यार्थी आढळलेल्या शाळा तत्काळ बंद करण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी दिली.