
सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकासाठी तयारी सुरू आहे. याबाबत बैठकही पार पडली आहे. यंदाचे अंदाजपत्रक हे वास्तवादी राहील. वाढीपेक्षाही थकीत कर वसुलीला प्राधान्य देणार असल्याचे महापालिका आयुक्त शीतल तेली-उगे यांनी स्पष्ट केले.
महापालिका प्रशासनाकडून यंदाच्या अंदाजपत्रक तयारीसाठी लगबग सुरू आहे. यासाठी नुकतीच एक बैठकही घेण्यात आली आहे. थकीत वसुली करण्यात येत असताना खर्च मात्र जैसे थे आहेत. अनेक वर्षांपासूनच्या थकबाकीसह चालू कर, असे दोन्ही मिळून 30 टक्के वसुलीचे प्रमाण आहे, तर चालू करवसुलीत 88 टक्के वसुली करण्यात यश आले आहे. महापालिका प्रशासनाकडून या थकबाकी वसुलीकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे.
दरम्यान, यंदाचे महापालिकेचे अंदाजपत्रक वास्तववादी राहील. कोणत्याही करवाढीपेक्षा थकबाकी वसुलीला प्रशासन प्राधान्य देणार आहे. उत्पन्नवाढीसाठी नवे स्त्र्ााsत्र काही निर्माण करता येतील का, याचाही विचार करण्यात येत असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
गाळे भाडे वसुलीला स्थगितीमुळे उत्पन्नावर परिणाम
रेडीरेकनर दरासंदर्भात गाळे भाडे वसुलीला शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना स्थगितीचे आदेश दिले आहेत. यामुळे सोलापूर महापालिकेच्या गाळे भाडे वसुलीला ब्रेक लागला आहे. यामुळेही उत्पन्नावर परिणाम झाल्याचे आयुक्त शीतल तेली यांनी सांगितले. सोलापूर महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कामाच्या सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त तेली-उगले यांनी स्पष्ट केले.



























































