सोलापुरात सहकार संकुल उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोलापूर जिल्हय़ात सहकाराचे जाळे विस्तारलेले आहे. या जिल्हय़ात सर्वांत जास्त साखर कारखाने आहेत. सहकारातील तज्ञ, अधिकारी, कर्मचारी यांना जिल्हय़ाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था होण्यासाठी सहकार संकुल उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. याकरिता सहकारी संस्थांचे साहाय्य घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सोलापूर शासकीय विश्रामगृहात त्यांनी पणन विभागाची बैठक घेतली. त्यानंतर ते बोलत होते. सोलापूर जिल्हय़ात 12 सहकारी आणि 21 खासगी साखर कारखाने आहेत. आतापर्यंत 1547 कोटी रुपयांच्या एफआरपीपैकी 870 कोटी रुपये शेतकऱयांच्या खात्यावर जमा झाले असून, हे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 121 लाख मेट्रिक टन उसाचे आतापर्यंत गाळप झाले असून, सर्व उसाचे गाळप होईल, असे नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी सहकारी संस्थांचे अपर निबंधक शैलेश कोथमिरे, विभागीय सहनिबंधक संगीता डोंगरे आदी अधिकारी उपस्थित होते.

सोलापूर जिह्यातील 192 सहकारी संस्थांची निवडप्रक्रिया लवकरच

n साखर व सहकार क्षेत्राचे केंद्रस्थान असलेल्या सोलापुरात सहकारी संस्थांच्या सहकार्यातून सहकार संकुल उभारण्यात येणार आहे. याचा लाभ शेतकऱयांना, सहकार क्षेत्राला होणार असून, सहकारतज्ञ, अधिकारी व कर्मचाऱयांच्या निवासाची सोय होणार आहे. खरिपाप्रमाणे रब्बी पीक कर्जाचे वाटप करावे, अवैध सावकारीवर अंकुश ठेवावा आणि जिल्हय़ातील 192 सहकारी संस्थांचा निवड प्रक्रिया कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, असे त्यांनी सांगितले.