दक्षिण आफ्रिकेने रोखला टीम इंडियाचा विजयी रथ, रोमहर्षक सामन्यात केला पराभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात आज दक्षिण आफ्रिकेने सात गडी राखून विजय मिळवला. डेव्हिड मिलर आणि रॅसी वॅन डरड्युसेनच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर आफ्रिकेने टीम इंडियाने दिलेले 211 धावांचे लक्ष्य गाठले. या पराभवामुळे टीम इंडिया सलग 13 विजयांचा विश्वविक्रम करू शकला नाही.

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने 210 धावा केल्या. यात इशान किशनने 76, श्रेयस अय्यरने 36 व हार्दीक पांड्याने 31 धावांची खेळी खेळली. 20 षटकात टीम इंडियाने 210 धावा केल्या. त्य़ानंतर फलंदाजीला आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी संथ सुरूवात केली. मात्र नंतर डेव्हिड मिलर याने 31 चेंडूत 64 आणि रॅसी वॅन डरड्युसेन 46 चेंडूत 75 धावा करत त्यांच्या संघाला विजय मिळवून दिला.