स्पार्ंटगने उडवला मांडवी मुस्लिमचा धुव्वा

अथर्व अधिकारी, अर्जुन बागायतकरची दमदार शतके आणि आर्यन दलालच्या पाच विकेट्सच्या जोरावर यजमान स्पार्ंटग क्लब कमिटीने मांडवी मुस्लिम संघाचा 189 धावांनी धुव्वा उडवत 37 व्या श्रीधर देशपांडे स्मृती समर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. अथर्वच्या नाबाद 103 आणि अर्जुनच्या 104 धावांच्या जोरावर 20 षटकांत 2 बाद 248 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर आर्यन दलालने आपल्या भेदक गोलंदाजीने मांडवी मुस्लिम संघाला अवघ्या 59 धावांवर गुंडाळत संघाच्या मोठय़ा विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक ः स्पोर्टिंग क्लब कमिटी ः 20 षटकांत 2 बाद 248 (अथर्व अधिकारी नाबाद 103, अर्जुन बागायतकर 104, प्रशांत मोरे 4-35-1, प्रशांत ठोंबरे 3-29-1) विजयी विरुद्ध मांडवी मुस्लिम क्लब ः 13.1 षटकांत सर्वबाद 59 (आर्यन दलाल 4-2-7-5, निरेक गावंड 2.1-1-13-2, यश जठार 3-14-2).