डिस्कव्हरीवर पाहा… चंद्रावरचा पहिला प्रवास

180

सामना प्रतिनिधी । मुंबई

20 जुलै 1969 रोजी नील ऑर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. या पराक्रमाला आज 20 जुलै 2019 रोजी 50 वर्षे पूर्ण होत असून यानिमित्त डिस्कव्हरी चॅनेलवर पहिल्या चंद्रमोहिमेचा संपूर्ण प्रवास उलगडण्यात येणार आहे. डिस्कव्हरी सायन्स चॅनेलवर शनिवारी रात्री 9 वाजता ‘अपोलो : द फॉरगॉटन फिल्म्स’ दाखविण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पहिल्या चंद्रमोहिमेची सर्व माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर दर शनिवारी आणि रविवारी रात्री 8 वाजता ‘मून 50’ हा कार्यक्रम सादर होणार असून यात ‘नासा’चा प्रवास दाखविण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या