सत्यजित मित्तल यांना ‘स्वच्छ भारत पुरस्कार 2018’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी पद्धतीच्या शौचालयाच्या डिझाइनमध्ये अत्याधुनिकता आणत शौचाला बसणाऱ्या व्यक्तीच्या पायावर अथवा पाठीवर ताण येणार नाही अशा स्क्वाटइज टॉयलेटची निर्मिती करणारा एमआयटीचा युवा अभियंता सत्यजित मित्तल याला ‘स्वच्छ भारत पुरस्कार 2018’ देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त राष्ट्राच्या ‘स्वच्छ दिवस 2018’ अभियानाचे महासचिव यांच्या हस्ते दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात आयोजिलेल्या ‘महात्मा गांधी इंटरनॅशनल सॅनिटेशन कन्व्हेंशन’ या कार्यक्रमात मित्तल याला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने या सोहळ्याचे आयोजन केले होते.