
श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ धावपट्टीच्या दुरुस्ती आणि सुधारणा कामांसाठी 1 ते 15 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विमानतळावरील सर्व उड्डाणे पूर्णपणे बंद राहणार आहेत. या निर्णयामुळे हजारो प्रवाशांसह पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विमानतळ प्रशासनाच्या नियोजनानुसार, धावपट्टी अधिक सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी हे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधील 15 दिवस कोणतेही विमान श्रीनगर विमानतळावर उतरू किंवा उड्डाण करू शकणार नाही.

























































