‘सृजनोत्सव’ रंगणार, बोरिवलीत एकांकिका महोत्सवाचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने सुरू झालेल्या ‘सृजन’ चळवळीला आता तीन वर्षे पूर्ण होत आहेत. ‘सृजन- द क्रिएशन’च्या तिसऱया वर्धापन दिनाचे औचित्य साधून 13 ते 15 मेदरम्यान ‘सृजन- द क्रिएशन’तर्फे ‘सृजनोत्सव 2023’ हा भव्य एकांकिका महोत्सव रंगणार आहे. याअंतर्गत सृजनच्या कलाकारांच्या एकपात्री, नृत्य, गाणं, स्किट, कविता वाचन, विविध कलाकृती सादर होणार आहेत. सकाळी 11 ते रात्री 10 दरम्यान ऑक्टिव्हिटी सेंटर, श्रीकृष्ण नगर, बोरिवली पूर्व येथे हा ‘सृजनोत्सव 2023’ रंगणार आहे. ‘ह्या’, ‘मेन इन ब्लॅक’, ‘झुला’, ‘हेल्पलेस’, ‘रूममेट’, ‘हे गेले’ अशा विविध एकांकिकांचा आस्वाद या महोत्सवात घेता येणार आहे. विजय तेंडुलकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित ‘मित्राची गोष्ट’ हे दोन अंकी नाटकही सृजन क्रिएशनतर्फे सादर होणार आहे. महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य आहे.