
सामना ऑनलाईन, मिदनापूर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला आज तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये ‘अपशकुन’ झाला. मोदी यांच्या मिदनापूर येथील सभेसाठी उभारण्यात आलेला मंडप कोसळण्याची दुर्घटना घडली. त्यात १३ महिलांसह ६७ जखमी झाले.
जखमींचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी शक्यता घटनास्थळी असलेल्या सरकारी अधिकाऱयांनी व्यक्त केली. सभेला आलेले काही अतिउत्साही भाजप कार्यकर्ते मंडपावर चढले होते. त्याचा भार न पेलवल्यामुळे तो कोसळला, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.




























































