गद्दारीची बक्षिसी जिल्हा नियोजन समितीवर मिंध्यांची वर्णी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना सोडून शिंदे गटात सामील झालेल्यांची मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती करून गद्दारीची बक्षिसी देण्यात आली आहे. राज्याच्या नियोजन विभागाने आज या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

नव्या सरकारमधील बेबनावामुळे महामंडळावरील नियुक्त्या रखडल्या आहेत. त्यामुळे  भाजप व शिंदे गटात नाराजी वाढत आहे. पण आता शिंदे गटातील नाराजांना शांत करण्यासाठी विविध समित्यांवर नियुक्त्या करण्यास सुरुवात झाली आहे.

याचाच भाग म्हणून मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीवर शिंदे गटात दाखल झालेल्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि श्रीकांत सरमळकरांचे पुतणे कुणाल सरमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण श्रीकांत सरमळकर हे शिवसेनेसोबत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एकनिष्ठ आहेत. तर समाधान सरवणकर यांचे वडील व आमदार सदा सरवणकर दादरमधील गोळीबार प्रकरणावरून अडचणीत आले आहेत. दादर पोलीस स्टेशन परिसरात झालेला गोळीबार सदा सरवणकर यांच्याच रिव्हॉल्व्हरमधून झाल्याचे बॅलिस्टीक अहवालातून स्पष्ट झाले आहे.

समितीतील सदस्य

समाधान सरवणकर, रश्मी भोसले, किशोर जाधव, विजय कोरगावकर, कुणाल सरमळकर, अजय देसाई, अल्ताफ दाऊद खान पेवेकर, रामप्रसिद्ध दुबे, शीतल म्हात्रे.