किराणा माल, भाजी-फळांची दुकाने सकाळी 7 ते 11 पर्यंतच चालू राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोगाचा फैलाव रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. तरीही गर्दी कमी होत नसल्याने राज्य शासनाने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

किराणा मालाची दुकाने, फळे-भाजीची दुकाने फक्त सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंतच चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता दुकाने बंद झाल्यानंतर रात्री 8 वाजेपर्यंत या दुकानांद्वारे घरपोच सुविधेला मात्र परवानगी असेल असं सरकारने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी 20 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे.

हा आदेश खालील वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या दुकानांसाठी लागू असेल

  • किराणा मालाची दुकाने
  • भाजी दुकाने
  • फळ दुकाने
  • डेअरी
  • बेकरी
  • कनफेकशनरी
  • सर्व खाद्य दुकाने ( चिकन, मटन, पोल्ट्री , फिश सह )
  • कृषि उत्पादनशी संबंधित दुकाने
  • पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने
  • पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकाने

या दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत डोम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल.