सुधा मुर्ती यांच्या गोष्टींवर अ‍ॅनिमेटेड सिरीजची निर्मिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध लेखिका आणि पद्मभूषण पुरस्कार विजेत्या सुधा मूर्ती यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टी बऱ्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. याच गोष्टी आता अ‍ॅनिमेटेड सिरीजच्या रुपात लहान मुलांना पाहता येणार आहे. सिरीजमध्ये आजी तिच्या नातवंडांना गोष्टी सांगताना दिसणार असून आजीचे पात्र हे सुधा मूर्ती यांच्यावरच बेतलेले आहे. या सिरीजची निर्मिती सुधा मूर्ती यांची सून अपर्णा कृष्णन यांनी केली आहे. या सिरीजसाठी तयार करण्यात आलेले गाणे हे प्रसून जोशी यांनी लिहिले असून त्याला शांतनू मोईत्रा यांनी संगीत दिले आहे. या सिरीजच्या लाँचिंगचा कार्यक्रम मंगळवारी मुंबईत पार पडला.