
सामना प्रतिनिधी । पुणे
बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रवींद्र मराठे, कार्यकारी संचालक आर. के. गुप्ता यांचे अधिकार काढून घेतल्याच्या निर्णयाविरुद्ध बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. लोकमंगल या मुख्यालयामध्ये बँकेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सभा पार पडली. यामध्ये उच्च अधिकाऱ्यांवर झालेल्या अन्यायकारक कारवाईचा निषेध करण्यात आला. संचालक मंडळाच्या या निर्णयाविरोधात ३० जून ते ५ जुलै दरम्यान ‘निषेध सप्ताह’ पाळण्यात येणार आहे, अशी माहिती युनायटेड फोरम ऑफ महाबँक युनियन्सतर्फे देण्यात आली. व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार असलेले ए. सी. राऊत यावेळी उपस्थित होते.


































































