आन्वा येथे तलावात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

29

सामना प्रतिनिधी । पारध

भोकरदन तालुक्यातील आन्वा पाडा येथील चौदा वर्षीय विद्यार्थी जवळच असलेल्या पाझर तलावाजवळ पोहण्यासाठी गेला आणि पाण्यात बुडून मृत्यू झाला शिक्षकांच्या खबरी वरुन पारध पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद केली.

पोलिस सुत्राकडून मिळालेली माहीती अशी की, आन्वापाडा येथील मदरसा जमिया इस्मालिया रमाझुलउलुम मदरसा येथील व्यवसाय शिक्षण घेणारा पुणेचा विद्यार्थी अयानखा इम्तियाजखा (१४) हा १९ जुलै रोजी शाळेला आठवडी बाजाराची सुट्टी आसल्याने आपल्या मित्रांना घेऊन कोणलाही न सांगता दुपारी चार वाजेच्या दरम्यान जवळच आसलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले. परंतु अयानखा यास पाण्याचा अंदाज नआल्याने तो पाण्यात बुडाला ही माहीती शिक्षक मुजीव निजानखा पठाण यांना दिली पठाण यांच्या खबरी वरून पारध पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.

रात्री उशीर झाल्याने पारध पोलिसांनी आज २० जुलै रोजी स. पो. नि. शंकर शिंदे, पोलिस नाईक प्रकाश सिनकर, पो. काँ. सुरेश डुकरे यांनी घटना स्थळी जाऊन चार ते पाच तरूणांच्या मदतीने तलावाच्या बाहेर काढले. परंतु पाण्यातच त्याचे निधन झाले होते. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश शिनकर व पो.का.सुरेश डुकरे हे करीत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या