सनी लिओनीचा मराठमोळा लूक, ‘नऊवारी’ साडीतला फोटो सोशल मीडियावर व्हायरल

8648

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिचा बोल्ड लूक आपण पाहिला. अनेक चित्रपटात तिने कामूक दृश्य दिले आहेत. तिच्या हॉट अवतारामुळे सोशल मीडियावर ती नेहमीच चर्चेचा विषय असतो. मात्र सध्या ती साध्या आणि मराठमोळ्या लुकमुळे चर्चेत आली आहे. नऊवारी साडीतील तिचा फोटो सर्वांना घायाळ करत असून हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.

बुधवारी देशभरात गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष साजरे करण्यात आले. कोरोनाचा पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच ठिकाणच्या प्रभात फेऱ्या रद्द झाल्या. सामाजिक बांधिलकी जपत सर्वांनी घरात गुढी उभारत गर्दी करण्याचे टाळले. याच गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सनी लिओनी हिने इन्स्टाग्रामवर नऊवारी साडीतील एक फोटो शेअर केला आहे. गणपती बाप्पाच्या समोर सनी पिवळ्या-नारंगी रंगाच्या नऊवारी साडीत दिसत आहे. यासोबत तिने गुढीपाडवाच्या शुभेच्छा दिल्या असून कोरोनापासून वाचण्याचा, घरात राहण्याचा सल्लाही दिला आहे.


View this post on Instagram

Happy #GudiPadwa, #Ugadi and #ChetiChand everyone!! Be Safe, Be happy, Be at Home

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

आपली प्रतिक्रिया द्या