सनी लिओनीच्या सहकुटुंब न्यूड फोटोचा नेटवर धुमाकूळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
सनी लिओनीवर देखील सोशल मीडियावर अश्लील पोस्ट टाकते म्हणून डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलिवूडची अभिनेत्री सनी लिओनी हिच्या पतीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर काही लोकांनी टीका केलीय तर काहींनी याचे समर्थनही केले आहे.

सनीचा पतीन डॅनियलने ‘फादर्स डे’च्या निमित्ताने सनी लिओनी आणि मुलगी निशासोबतचा न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनी लिओनी आणि मुलगी निशा पूर्णपणे न्यूड असून प्रायव्हेट पार्ट लपवताना दिसत आहेत, तर डॅनिअरल टॉपलेस दिसत आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी चांगल्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा फक्त स्ंटटपणा असून असे फोटो सोशल मीडियावर टाकण्याला विरोध केला आहे, तर काहींनी फादर्स डे च्या दिवशी यापेक्षा जास्त चांगला फोटो असूच शकत नाही असे म्हटले आहे.

sunne-newd

सनी लिओनी आणि पती डॅनियलने २०१७मध्ये एका अनाथ मुलीला दत्तक घेतले होते आणि तिचे नाव निशा असे ठेवले होते. त्यानंतर या दोघांना सरोगसी पद्धतीने दोन जुळ्या मुलांनाही जन्म दिला होता. या तिन्ही मुलांसोबतचा फोटो सनी आणि तिचा पती डॅनियल सोशल मीडियावर शेअर करत असतो.