प्रदर्शनापूर्वीच ‘सनी’ हाऊसफुल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रदर्शनापूर्वीच मराठी चित्रपट ‘सनी’ हाऊसफुल झाला आहे. नुकताच हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’चा प्रिह्यू शो पुण्यातील एका चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला होता. या शोला प्रेक्षक तिकीट काढून हजर राहिले. अवघ्या काही वेळातच शो हाऊसफुल झाला. विशेष म्हणजे, प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ‘सनी’च्या दुसऱया शोचेही यावेळी आयोजन करण्यात आले.

‘सनी’ची भूमिका साकारणारा ललित प्रभाकर म्हणाला, माझ्यासाठी हा अनुभव सुखद आहे. सनी प्रेक्षकांना आवडतोय. जसं प्रेम प्रदर्शनापूर्वी दिलं आहे तसंच प्रेम प्रदर्शनांनंतरही द्याल याची खात्री आहे. घरापासून दूर जाणाऱया प्रत्येक व्यक्तीची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे, त्यामुळे प्रेक्षकांना तो कुठेतरी आपल्या जवळचा वाटतोय. चित्रपटात ललित प्रभाकर याच्यासह चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या आहेत. चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे.