सर्वोच्च न्यायालयाचे वकील माजिद मेमन यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोच्च न्यायालयाचे वकील माजिद मेमन यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सौगत रॉय आणि डेरेक ओ ब्रायन यांच्या उपस्थितीत मेमन यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला.

माजिद मेमन यांची निवड 2014मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचे खासदार म्हणून झाली होती. मात्र, काही काळापूर्वीच ते राष्ट्रवादीमधून बाहेर पडले आहेत. मेमन यांनी आतापर्यंत तक्रार निवारण, कायदा आणि न्याय विभागातील संसदीय समितीचे सदस्य, तसंच कायदा आणि न्याय मंत्रालयातील सल्लागार समितीचे सदस्य म्हणून काम केलं आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर मेमन यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रशंसा करत त्यांचा उल्लेख वाघीण असा उल्लेख केला.

ते म्हणाले की, तृणमूलच्या या वाघिणीची डरकाळी फक्त पश्चिम बंगालमध्येच नाही तर पूर्ण देशात ऐकू येत आहे. त्यांनी पैसा आणि बळाचा जोर असलेल्या पक्षाला आव्हान दिलं आहे. देशभरातील सुव्यस्थेची स्थिती गंभीर असून केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग होत आहे, असं मेमन म्हणाले.