
सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे आता पुण्यातील हॉटेलला ‘बर्गर किंग’ हे नाव वापरता येणार आहे. उच्च न्यायालयाने बर्गर किंग हे नाव वापरण्यास सक्त मनाई केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली असली तरी या प्रकरणी उच्च न्यायालयातील सुनावणी सुरू ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत.

























































