अजित पवार गटाच्या अपात्रतेवर आज सर्वोच्च सुनावणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
हे पाच न्यायमूर्ती सध्या काय करतात याबाबत अनेकांना माहिती नाहीये. या पाचपैकी 4 न्यायमूर्ती हे आता निवृत्त झाले असून यातले एक न्यायमूर्ती हे सर्वोच्च न्यायालयात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसशी बंडखोरी करून सत्तेत सहभागी झालेले अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. मागील सुनावणीवेळी दोन्ही गटांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. त्यामुळे उद्याच्या सुनावणीत काय नवा युक्तिवाद होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार गटातील 41 आमदारांना अपात्र करण्याची मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे. पक्षाची मान्यता नसताना विरोधात जाऊन अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याबाबत त्या नऊ मंत्र्यांवरही कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर उद्या सकाळी 11 वाजता या याचिकेवर सुनावणी होईल.