राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांपैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही. ते सगळे खोट ठरलेले आहे. 100 कोटी आरोपाचे काही झालेले नाही. त्यामुळे आता दुसऱ्या कोणाची यात नाव म्हणजे मला आता हे सगळे बालिशपणाचे वाटत आहे मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आणि आरोप-प्रत्यारोप कसे काय हो आहेत? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
या पत्राची वेळ बघा, विधासभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. इतके वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे. गेली 10 वर्षे यांची सत्ता आहे. या गोष्टी आताच कशा काय येतात? गेली अडीच वर्षे त्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. बरोबर विधानसभेआधीच हे पत्र, आरोप-प्रत्यारोप कसे काय येतात? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी सचिन वाझेच्या आरोपांवर केला.
महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झाले आहे. बालिशपणाचे आरोप केले जात आहेत. आमचा पक्ष सुसंस्कृत आहे. गलिच्छ गोष्टी आम्ही कधी केल्या नाहीत. भाजपाची स्टाइल आहे की आधी आरोप करायचे नंतर त्यांनाच आपल्या पक्षात घ्यायचे. पत्र कोणी लिहिलेय? कधी लिहिलेय? मीही उद्या पत्र लिहून आरोप करेन, असे नसते. आम्ही कधीही खोटे आरोप करत नाही. आम्ही बदल करण्यासाठी राजकारणात आलो, असेही त्या म्हणाल्या.
संजय राऊत, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ या सर्व नेत्यांना त्यांनी किती त्रास दिला, ते मी पाहिलं आहे. भारतीय जनता पार्टीने ज्या 12 लोकांवर आरोप केले होते ते आज कुठे आहेत? आजचे राजकारण खूप गलिच्छ झाले आहे. निवडणुकीच्या आधी पत्र आणि नाव त्यांनी का घेतलं असाही सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
भ्रष्टाचार झाकण्यासाठी भाजपाचे वाशिंग मशीन आहे. आमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष आहे. आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारे लोक आहेत. आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात आलो आहोत. अशा प्रकारे कोणाचा बदला घेण्यासाठी किंवा अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण आम्ही कधी करत नाहीत आणि पुढेही कधी करणार नाही. अशा प्रकारचे आरोप आम्ही कधीही कोणावरही केले नाहीत. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खोटे आहेत असेही त्या म्हणाल्या.